सहाय्यक आयुक्त कल्पना पिंगळे यांच्यावरती हल्ला करणाऱा आरोपी अमरजीत यादव यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाईची पोलीस गृहरक्षक संघर्ष समितीकडून मागणी

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) : कासारवडवली भागातील मार्केट परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या माजिवडा मानपाडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त सौ कल्‍पना पिंगळे यांच्यावर फेरीवाल्यानी चाकूहल्ला केल्याने त्यांची दोन बोटे तुटली गेली त्यावेळी त्यांना वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या अंगरक्षकाचे ही एक बोट कापले गेले. या दोघांवर ठाणे ज्युपिटर हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत.

या प्रकरणातील आरोपी अमरजीत यादव याला कासारवाडी पोलिसांनी अटक केली आहे परंतु अशा अतिक्रमण करणाऱ्या यादव यास मोक्कांतर्गत कारवाई करण्यात यावी जेणेकरून एका महिला अधिकाऱ्यावरती हात उचलण्याची कोणीही हिंमत करणार नाही या सर्व घटनेमुळे महापालिकेतील अधिकारी कर्मचारी व इतर संघटनेनेसुद्धा मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त केला आहे भविष्यात अशा घटना घडू नये तसेच अतिक्रमण हटवताना पोलीस अधिकारी व सुरक्षा महामंडळ व होमगार्ड यांची तात्काळ मदत घेणे आवश्यक आहे जेणेकरून अतिक्रमण अधिकाऱ्यांवर अतिक्रमण कारवाई करताना कोणताही ताण पडणार नाही.

kalpana-pimple-in-jupiter-hospital

आरोपी यादव याचा जामीन नामंजूर करणे व यास मोक्काअंतर्गत कारवाई करून त्याला स्थानबद्ध करावे , आरोपी त्याच्या मूळ गावी त्याच्यावर गुन्हे दाखल आहे की नाही याची सुद्धा चौकशी करावी याबाबतचे निवेदन पोलिस गृहरक्षक संघर्ष समितीचे संस्थापक संचालक सिद्धार्थ डी जाधव , धीरज वी पार्सेकर निवड समिती अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा अध्यक्ष सतीश बनसोडे, सौ शोभना ओवाळ महिला अत्याचार अध्यक्षा, सौ प्रीती खानेकर वाहतूक जिल्हाध्यक्षा, सौ सरोज पोटफोडे युनिट वाहतूक अध्यक्षा ,सौ तृप्ति सुर्वे समाजसेविका ,सौ कांचन साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस आयुक्त यांना आरोपी वरती मोक्कांतर्गत कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here