बोरू बहाद्दर संजय राउतांवर कारवाई करा.

पुणे (विशेष प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणात असभ्य भाषा वापरून राजकीय शिष्टाचाराला तिलांजली देण्याचं काम संजय राऊत सातत्याने करत आहेत.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्याविरोधात जाहीरपणे असभ्य भाषेत वक्तव्य करणाऱ्या राउतांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाई करावीच. म्हणून आज पुण्यात तक्रार दाखल करतोय. भा. द. वि. कलम 503, 505, 153-ब (१)(क) नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना त्वरीत अटक करण्यात यावी, अशी पुणे शहर भाजपची मागणी आहे.

नारायण राणेंच्या विरोधात केवळ सूडबुद्धीने तातडीच्या कारवाईची तत्परता दाखवणारे हे सरकार आता संजय राऊत यांच्यावर काय कारवाई करणार, हे आम्हीही बघू आणि जनताही बघतेय.संजय राऊत यांची राष्ट्रवादीसोबतची निष्ठा सर्वज्ञात आहे. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी राऊत यांनी शिवसेनेला राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलंय. राउत यांच्यावर कारवाई व्हावी. नाहीतर याचे पडसाद राज्यभर उमटतील.

यावेळी सरचिटणीस गणेश घोष, राजेश येणपुरे,दिपक पोटे,दिपक नागपुरे, संदीप लोणकर, इशानी जोशी, संजय मयेकर,संजय देशमुख यांच्यासह कायदा सेल पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here