समतोल फाऊंडेशनतर्फे कल्याण शहर व परिसरात बैल पोळा सण उत्साहात साजरा

कल्याण (प्रतिनिधी सुभाष जैन) : बैल पोळा हा सण लहानपणी खूप आनंदाने साजरा करायचो शाळेत असताना बैल सजवून गावात आणायची झुल टाकायची ,शिंगाला कलर लावायचा नदीवर बैलांना धुवायला घेऊन जायचे चाबूक उगाचच मारून बैलांना उड्या मारायला लावायचे खुपच मज्जा यायची.

आज सुदैवाने कल्याण येथील समतोल फाउंडेशन मधील मुलांनी हा सण साजरा केला आहे. आपली संस्कृती जपली आहे.शेती, नांगरणी ,बैल हे समीकरण खूप नैसर्गिक आहे.आम्ही यातही समतोल राखण्यासाठी गोसेवा च्या माध्यमातून बैल आणि सेंद्रिय शेती मध्ये मुलांना प्रशिक्षण देत आहोत.

केमिकल शेती पेक्षा नैसर्गिक सेंद्रिय शेती हा रोगमुक्त होण्याचे औषध आहे हे सांगायला लागणे हे दुर्दैवच आहे .पण बैल पोळा साजरा झाला पाहिजेच नंदीला जपलात तरच जगायला संधी आहे. अशी माहिती संस्थापक समतोल फाऊंडेशनचे विजय जाधव यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here