विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी वाढदिवसानिमित्त वाटले कोरोना विमा कवच

मुंबई(कुलाबा) (प्रमिला जाधव) – शिवसेना दक्षिण मुंबई विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या वाढदिवसानिमित्त विभागातील कोरोना रुग्णांना सेवा देणाऱ्या कोरोना योध्दाना, कार्यकर्त्यांना, शाखाप्रमुख आणि समाजसेवकांना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे कोरोना विमा कवच शिवसेना चिराबाजार मध्यवर्ती कार्यालय येथे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात शिवसेना खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप, गरजू नागरिकांना रेशन किट वाटप आणि कोरोना योध्दाना विमा कवच वाटप करण्यात आले. आम्ही दरवर्षी माझ्या वाढदिवसानिमित्ताने अनेक सामाजिक कार्यक्रम घेत असतो. परंतु या कोरोनामुळे हे कार्यक्रम घेणे शक्य झाले नाही. आम्ही या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विभागात अनेक ठिकाणी आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिरांचे आयोजन केले. तसेच विभागातील नागरिकांसाठी स्क्रिनिंग आणि कोरोनाची मोफत टेस्ट देखील आयोजित करण्यात आली असल्याची माहिती विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी दिली. या कार्यक्रमात महिला विभाग संघटक जयश्री बळळीकर,माजी नगरसेवक गणेश सानप, शाखाप्रमुख बाळा अहिरेकर, संतोष शिंदे, प्रथमेश सकपाळ, यशवंत कोळेकर, तेजेश सकपाळ आणि असंख्य शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here