मुंबई (प्राजक्ता अरूण चव्हाण) – शिवशाहिर, थोर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून रोहित दादा पवार विचार मंच यांच्यावतीने कोचरी भोजवाडीमधील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी (एस.एस.सी) परीक्षेत उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन करून यशस्वी झालेल्या कु. मयुर मनोहर मांडवकर, कु. रोहित रविंद्र नामे, कु. सिद्धेश संजय भातडे, कु. प्रणय प्रकाश भातडे आणि कु. तुषार रमेश भातडे या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा मंचचे ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष केतन द. भोज यांनी “गौरवपत्र” देऊन सन्मान करत विद्यार्थ्यांना अभिनंदनासह पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. केतन दत्ताराम भोज यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे स्थानिकांकडून कौतुक होत असल्याचे समोर आले.








