मराठी भारती संघटनेचे आज महाराष्ट्र वीज बिल होळी आंदोलन

मुंबई (ॲड.पूजा बडेकर) – मराठी भारती संघटनेच्यावतीने आज संपूर्ण महाराष्ट्रा भर वीज बिलाची होळी करून लॉकडाऊन च्या काळातील लोकांना आलेली अव्वाच्या सव्वा बिल आणि वाढीव वीज दर ह्याच्या निषेध करण्यात आला आज दिवस भर संपूर्ण महाराष्ट्र भर हे आंदोलन चालू राहणार असल्याची माहिती अध्यक्ष पूजा बडेकर ह्यांनी दिली,,
गेली अनेक दिवस मराठी भारती संघटना ही वाढीव विजबिलाच्या विरोधात वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करीत आहे तसेच ईमेल, ट्विटर च्या माध्यमातून मा. ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अनेक पत्र पाठवले, अनेक ट्विट केले अखेर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पुढाकाराने विजबिलसंदर्भात बैठक झाली ज्यात ऊर्जामंत्री ह्यांनी नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे आश्वासन दिले आहे तरी जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार अशा इशारा कार्यवाह विजेता भोनकर ह्यांनी या वेळी दिला.
300 युनिट पर्यंत गोरगरीब जनतेला वीजबिल माफी आणि दि. १ एप्रिल २०२० रोजी केलेली दरवाढ त्वरित रद्द करावी तसेच या काळात कोणतेही स्थिर आकार लोकांच्या कडून घेतले जाऊ नये ह्या प्रमुख मागण्या आहेत असे संघटक राकेश सुतार सांगितले. लवकरात लवकर मागण्या मान्य झाल्या नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र होईल असा इशारा उपाध्यक्ष आशिष गायकवाड ह्यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here