मुंबई (प्राजक्ता अरूण चव्हाण) – बोरीवली पश्चिम येथील बोस्को बॉयज होम या वस्तीगृहात मुंबई पश्चिम उपनगर विभागीय संघटक
आणि दिशा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष्या सौ. दिशा कळंबे गेले ४ वर्षापासून येथे रक्षाबंधनच्या दिवशी राखी पोर्णिमेचा कार्यक्रम वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसाठी घेत असतात. या वर्षी ही कोरोना काळातील सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळत हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यांच्याबरोबर रंजना फडके, गीता राऊत आणि अन्य दोन भगिनी यांची ही उपस्थिती होती. यावेळी सौ. दिशा कळंबे यांनी स्वतः आणि अन्य भगिणिनी मास्क, हैण्डग्लोवसचा वापर करून, राख्या सॅनिटायझर करून उपस्थित विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व नियम पाळत राख्या बांधण्याचा कार्यक्रम पार पाडला. त्यानंतर व्यसनांचे प्रकार, व्यसनांपासून होणारे शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि कुटुंबावर होणारे दुष्परिणाम, देशभरात व्यसनांमुळे दिवसाला होणारे मृत्युचे प्रमाण याबद्दल माहिती देत स्व – सरक्षण म्हणून व्यसनांपासून दूर राहा असा संदेश देण्यात आला. त्याचबरोबर दिशा प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने व्यसनग्रस्त व्यक्तिमुळे उध्वस्त झालेल्या कुटुंबातील महिलांना व त्यांच्या मुलांना समुपदेशन, उद्योग, बचत गट, विविध उपक्रमाच्या माध्यमातून कसे पाठबळ दिले जाते याबद्दल माहिती देऊन समाजकार्यास कसा हातभार लावावा हा संस्कार मुलांसमोर मांडला.
बोस्को बॉयज होमचे मुख्य अधिकारी फादर. डिएगो यांनी कळंबे यांचे स्वागत केले. तसेच एम. एस. डब्लू. दत्ता गाड़े यांनी संस्थेची माहिती उपस्थित भगिनीना दिली. फादर. सुनील पिंटो यांनी आभार प्रदर्शन करून राखीपोर्णिमेच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या.







