धुळे (महाराष्ट्र सह संपादक तिलोत्तमदास बोंडे) : येथील सेवानिवृत्त पशुधन विकास अधिकारी डॉ. दिनेश किसन अलोने (वय ७७) यांचे मंगळवार (दि. ७) रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
दैनिक देशदूत चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार हेमंत अलोने यांचे ते वडील होत. डॉ. अलोने यांची अंत्ययात्रा आज बुधवार दि 8 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता मिल परिसरातील हरिओम कॉलनी येथील राहत्या घरापासून निघेल.






