छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांना अटक; ब्राह्मण समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य भोवले

रायपूर : ब्राह्मण समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी छत्तीसडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील ८६ वर्षीय नंदकुमार बघेल यांना अटक करण्यात आली.एखाद्या मुख्यमंत्र्यांच्या वडिलांना अटक होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. वडील म्हणून मला त्यांचा आदर असला तरी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी त्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, असे सांगून मुख्यमंत्री बघेल यांनी याप्रकरणी कारवाईत हस्तक्षेप केला नाही.

नंदकुमार बघेल यांनी ब्राह्मणांवर बहिष्कार टाकण्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. ब्राह्मण हे परकीय असून, त्यांच्यावर बहिष्कार टाका तसेच त्यांना आपल्या खेड्यांमध्ये प्रवेशही देऊ नका, असे बघेल म्हणाले होते. याविरोधात सर्व ब्राह्मण समाज या संघटनेच्या तक्रारीनंतर रायपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. धर्म, जात, वंश, इत्यादी आधारांवर विविध समुदायांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याच्या आरोपांखाली विविध कलमे त्यांच्यावर लावण्यात आली होती.

रायपूर पोलिसांनी नंदकुमार बघेल यांना रायपूर येथील न्यायालयात हजर केले होते. त्यांची १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here