दाऊद गँगचा फायनान्सर युसूफ लकडावालाचा आर्थर रोड तुरुंगात मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि डी गँगचा फायनान्सर युसूफ लकडावालाचा (७४) ऑर्थर रोड कारागृहात मृत्यू झाला आहे. लकडावालाला जे जे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेले आहे. एन. एम. जोशी मार्ग पोलिसांचे एक पथक आर्थर रोड कारागृहात तपासासाठी गेले असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रताप भोसले यांनी दिली.

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक युसुफ लकडावालाला ईडीकडून मे महिन्यात अटक करण्यात आली होती. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि बॉलीवूडसह डी गँगचा फायनान्सर युसुफ लकडावाला यांची सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) चौकशी केली होती. खंडाळा येथील हैदराबादच्या निजाम कुटुंबियांच्या मालकीची ५० कोटी रुपयांची जमीन बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने बळकावल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली होती. चौकशीअंती मनी लाँड्रीग प्रकरणी अटक केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here