कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) : कोल्हापुरच्या पन्हाळा तालुक्यातील सातवे येथील शाळकरी मुलाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
गावातील मुलीच्या प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याचे समजते. मोन्या उर्फ शिवतेज विनायक घाटगे (वय,१८) असं त्या मुलाचे नाव आहे. मांगले (ता. बत्तीस शिराळा) गावच्या हद्दीत शिवतेजला जबर माराहाण झाली होती उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे. ही खळबळजनक घटना काल (बुधवारी) रात्री मांगले गावच्या परिसरात धनटकी येथील शेतात घडली आहे.
मोन्या उर्फ शिवतेज विनायक घाटगे याचा मृतदेह कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. मात्र, संशयित आरोपींना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असं म्हणत त्याचे नातेवाईक आंदोलन करत आहेत. या घटनेमुळे हाॅस्पीटल परिसरात प्रंचड जमाव गोळा झाला आहे.






