इचलकरंजी (महाराष्ट्र सह संपादक मनोज सोनवले) : शहर पोलिस स्टेशनचे पोलिस इन्स्पेक्टर श्री.महाज यांची बुलंद पोलिस टाईम्स कार्यालयाला सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी बुलंद पोलिस टाइम्सच्या कार्याचे कौतुक केले.
पोलीस आणि जनतेतील दुवा या ब्रीदवाक्यासह वाटचाल करणाऱ्या बुलंद पोलीस टाइम्सच्या कार्याची माहिती घेण्यासाठी व कार्यालयातील सहकाऱ्यांची ओळख करुन घेण्यासाठी श्री.महाज यांनी आज (दि.९) रोजी इचलकरंजी शहर बुलंद पोलिस टाइम्स कार्यालयाला भेट दिली.
शहरातील वृत्तांकन आणि पोलिसांच्या नागरिकांसाठी असलेल्या सूचना यांना वेळोवेळी प्रसिध्दी देण्याचे कार्य केल्याबद्दल त्यांनी बुलंद पोलीस टाइम्सचे महाराष्ट्र सह संपादक मनोज सोनवले याचे कौतुक केलं असून, पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत.






