खुलताबाद (प्रतिनिधी समीर शहा) : आमदार प्रशांत भाऊ बंम्ब यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती स्तरावरील १५ व्या वित्त आयोगातून प्रभाकर बाबुराव शिंदे पंचायत समिती सदस्य तथा गट नेता यांच्या निधीतून बाजार सावंगी येथील एकता नगर कॉलोनी हायमास्ट लाईट (२ लाख ९५ हजार रुपये) आणि मारोती मंदिर येथे पेव्हर ब्लॉक बसवणे(१ लक्ष १० हजार रुपये) कामाचे उदघाटन करण्यात आले.
याप्रसंगी पंचायत समिती सभापती गणेश नाना आधाने,पंचायत समिती सदस्य प्रभाकर शिंदे,सरपंच आप्पाराव सांडु नलावडे, भाजपा संभाजीनगर जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर नलावडे, कॉट्रॅक्टर अरुण आघाडे, विनोद नलावडे,सुखदेव(बाळुभाऊ) नलावडे,गणेश पुंड,भाऊसाहेब धुमाळ,शरद नलावडे, जानकीराम नलावडे,विश्वभर नलावडे,आनंदा काटकर,राजेंद्र नलावडे,पोपट आबा नलावडे,सय्यद टेलर,कैलास नलावडे,किरण गवळी,नामदेव नलावडे,भाऊसाहेब नलावडे, मच्छीन्द्र नलावडे,लहू नलावडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.







