फिनिक्सच्या सामाजिक उपक्रमाने गणेशोत्सवास प्रारंभ; वंचित, दीनदुबळ्यांच्या रुग्णसेवेत ईश्वर भक्ती-जालिंदर बोरुडे

अहमदनगर (प्रतिनिधी) : श्री गणेशा ही आरोग्य देवता म्हणून ओळखली जाते, आपण आपल्या आरोग्याचे रक्षण केले पाहिजे. नियमित आहार-विहाराबरोबरच आरोग्य तपासणी ही महत्वाची बाब आहे. फिनिक्स फौंडेशनच्यावतीने नियमित मोफत आरोग्यदायी उपक्रम राबविले जात असतात. या मोफत शिबीराच्या माध्यमातून लाखो नागरिकांनावर उपचार करण्यात आले आहे.

नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी फिनिक्सच्यावतीने दर महिन्याला मोफत शिबीराच्या माध्यमातून गरजूंची सेवा केली जाते. कोरोना काळातही या शिबीरात खंड पडू न देता, अनेकांना दृष्टी देण्याचे काम सुरु आहे. आज श्री गणेशाची प्रतिष्ठापना सर्वत्र होत असतांना श्री गणेशाचे स्वागत आरोग्यदायी व्हावे. वंचित, दीनदुबळ्यांच्या रुग्णसेवेत ईश्वर भक्ती मानून या मोफत शिबीराच्या माध्यमातून गरजूंची सेवा करण्याची संधी यानिमित्त मिळाली आहे. यापुढेही अशी सेवा आपल्या हातून होवो, अशी श्री गणेश चरणी प्रार्थना असल्याचे प्रतिपादन फिनिक्स फौंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी केले.

फिनिक्स फौंडेशनच्यावतीने गणेश चतुर्थीनिमित्त नागरदेवळे येथे आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराच्या शुभारंभप्रसंगी जालिंदर बोरुडे बोलत होते. याप्रसंगी डॉ.संजय शिंदे, प्रशांत शिंदे, राजेंद्र बोरुडे, बाबासाहेब धीवर, ओम बोरुडे, आकाश धाडगे आदि उपस्थित होते.

या शिबीरात ३१८ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली तर ६७ गरजू रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच गरजू रुग्णांना अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब धीवर यांनी केले तर आभार राजेंद्र बोरुडे यांनी मानले. शिबीर यशस्वीतेसाठी फिनिक्सचे सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here