गोपालगंज (बिहार) : बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडिओत तेजस्वी यादव गरीब महिलांना पाचशे – पाचशेच्या नोटा वाटत जाताना दिसत आहेत.
गोपालगंजच्या बैकुंठपूरमधला हा व्हिडिओ आहे. गुरुवारी माजी दिवंगत राजद आमदार देवदत्त राय यांच्या पुण्यतिथी निमित्तानं श्रद्धांजली वाहण्यासाठी तेजस्वी यादव इथे दाखल झाले होते.
पीछे से कोई कहता है, कि ये लाल उन्हीं का है…. जिन्होंने लिखवा ली थी उनकी ज़मीन
बदले उसके चंद नोट के टुकड़े, आँचल में सबके डाल आया था…
लालू के लाल से पूछो गरीबी का माखौल क्यों उड़ाया… वोट को नोट क्यों दिखलाया
इंसानों की मज़बूरी का कुछ तो लिहाज़ कर लो…शर्म करलो बबुआ pic.twitter.com/xEYC6KaH8t— Neeraj kumar (@neerajkumarmlc) September 10, 2021
सभास्थळाकडे निघताना गाडीत पुढे चालकाच्या बाजुच्या सीटवर बसलेले पांढरे शुभ्र कपडे परिधान केलेले तेजस्वी यादव व्हिडिओत पाहायला मिळतात. काही महिला गाडीभोवती गोळा झाल्यानंतर त्यांच्या हातात पाच-पाचशेच्या नोटा टेकवत तेजस्वी यादव इथून रवाना झाले. काही लोक ‘तेजस्वी यादव, लालू यादवजी का बेटा’ असं म्हणत समोर आलेल्या नेत्याची ओळख पटवताना दिसत आहेत. महिलांना पैसे वाटताना तेजस्वी यादव यांना कुणीतरी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलं आणि हा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला.






