भाजपच्या पंचायत समिती सदस्या पुष्पाबाई जाधव यांची आत्महत्या

जालना (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील भाजपच्या पंचायत समिती सदस्या पुष्पाबाई गजनान जाधव (३५) यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकल नाही.

गुरुवारी ९ सप्टेंबर रोजी रात्री पुष्पाबाई यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह जेवण केले. जेवणानंतर त्यांचे पती गजानन जाधव व मुलगा घराबाहेर झोपी गेले तर मुलगी काकांच्या घरी झोपायला गेली. यानंतर पुष्पाबाई या घरात एकट्याच होत्या. रात्री त्यांनी घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवन संपवलं.

गजानन चव्हाण यांना सकाळी झोपेतून उठल्यावर सगळा प्रकार निदर्शनास आला. पुष्पाबाई यांच्या आत्महत्येचं कारण समजू शकले नाही. पुष्पाबाई जाधव या पंचायत समितीच्या झालेल्या निवडणुकीत २०१६ साली भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. पुष्पाबाई यांच्या पश्चात पती, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here