औरंगाबाद पोलिस दलात नारीशक्तीचे राज; पाच प्रमुख पदावर झाली महिला अधिकाऱ्यांची नेमणूक

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) : गृहविभागाने गुरुवारी पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांसह सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले. ऐन गणपती उत्सवाच्या मुहूर्तावर झालेल्या या बदल्यांमध्ये औरंगाबाद शहरातील पाच महत्त्वाच्या पदांवर वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे औरंगाबादच्या पोलिसदलात नारीशक्तीचे दर्शन राज निर्माण झाल्याची चर्चा शहरात आहे.

नव्याने झालेल्या बदल्यांनुसार, औरंगाबाद लोहमार्ग पोलीस अधीक्षक पदी मोक्षदा पाटील यांची बदली झाली आहे. तसेच शर्मिला घार्गे या औरंगाबाद गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधीक्षकपदी असतील. तसेच राज्य गुप्तवार्ता विभागात मीना मकवाना या उपायुक्त पदावर असतील. उज्ज्वला वनकर आणि अपर्णा गीते या शहर पोलिस उपायक्तपदाची धुरा हाती घेतील.

औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या पोलिस अधीक्षक पदावर मुंबई येथील पोलिस उपायुक्त निमित गोयल यांची बदली करण्यात आली आहे. तर मोक्षदा पाटील यांची बदली लोहमार्ग पोलिस अधीक्षक, औरंगाबाद विभागात करण्यात आली आहे. तसेच राज्यीतल पोलिस उपायुक्त पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या. यात औरंगाबाद शहर पोलिस आयुक्तालयातील मीना मकवाना आणि निकेश खाटमोडे पाटील यांचीही बदली करण्यात आली. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या जागी उज्ज्वला वनकर आणि अपर्णा सुधाकर गिते यांची नियुक्ती करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here