उस्मानाबाद (प्रतिनिधी) : राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने त्यातच उस्मानाबादचे पोलिस अधीक्षक राज तिलक रौशन यांची सुद्धा बदली (पोलिस अधीक्षक, उस्मानाबाद ते पोलिस उपायुक्त, मुंबई शहर) येथे झाली आहे. त्यांच्या ठिकाणी उस्मानाबादच्या पोलिस अधीक्षक म्हणून श्रीमती नीवा जैन (समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, गट-१, पुणे ते पोलिस अधीक्षक, उस्मानाबाद येथे झाली आहे.
अप्पर पोलिस अधीक्षक संदीप पालवे यांची बदली पोलिस अधीक्षक दहशतवादी पथक औरंगाबाद येथे झाली असून, त्यांच्या जागी सहायक पोलिस अधीक्षक लोणावळा पुणे येथील नवनीत कुमार कॉवत यांची बदली उस्मानाबाद अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून झाली आहे.
उस्मानाबाद येथील उपविभागीय पोलिस अधिकारी मोतीचंद राठोड यांची सहायक पोलिस आयुक्त, ठाणे शहर येथे झाली आहे. तर भूमचे उपविभागीय अधिकारी विशाल खांबे यांची अप्पर पोलिस अधीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, औरंगाबाद येथे बदली झाली आहे.






