ग्रंथालयाचे थकीत अनुदान मिळणार – ग्रंथालय सेनेचे प्रदेश अध्यक्ष बी.जे.देशमुख

धरणगाव (योगेश पी.पाटील) – महाराष्ट्रातील ग्रंथालयाचे अनुदान व कर्मचाऱ्यांचे वेतन मिळणार असल्याची माहिती ग्रंथालय सेनेचे प्रदेश अध्यक्ष श्री बी जे देशमुख सो यांनी दिले.
महाराष्ट्रातील अनुदानित सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय यांचे अनुदान थकले होते त्यामुळे अगोदरच अल्पशा वेतनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती. महाराष्ट्र ग्रंथालय सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यात पालकमंत्री,आमदार,जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन अनुदान तात्काळ वितरित करण्याची मागणी केली होती.
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे सो यांनी या कर्मचाऱ्यांचा भविष्याच्या विचार करून उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंत साहेब यांना आदेश देऊन तात्काळ अनुदान वितरित करावे दि.3 ऑगस्ट रोजी अनुदान वितरित करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत
राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब,उच्चतंत्र शिक्षण मंत्री श्री उदयजी सामंत साहेब,जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. गुलाबरावजी पाटील सो यांनी जे ग्रंथालय कर्मचाऱ्यांना अनुदान देऊन सहकार्य केले त्याबद्दल महाराष्ट्र ग्रंथालय सेनेचे प्रदेश उपप्रमुख पी एम पाटील सर,जिल्हा प्रमुख श्री डॉ प्रशांत पाटी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख योगेश पी पाटील सर्व जिल्ह्यातील व तालुक्यातील पदाधिकारी यांनी आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here