साकीनाका बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर भाजपचे औरंगाबादेत आंदोलन

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) : मुंबईतील साकीनाका येथील बलात्कार पीडित महिलेचा मृत्यू झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. राज्यभरातून राजकीय नेते तसेच नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. औरंगाबादमध्ये भाजप महिला आघाडीच्या नेत्या तसेच कार्यकर्त्या रस्त्यावर उतरल्या आहेत. भाजप महिला आघाडीकडून न्यू गणेश मंडळासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात भाजप नेते, महिला कार्यकर्त्या तसेच नागरिक उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी भाजप कार्यकर्त्या तसेच इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी राज्य सरकार, पोलीस प्रशासन तसेच महिला अत्याचाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. औरंगाबादच्या न्यू गणेश मंडळासमोर हे आंदोलन करण्यात आले. भाजप रस्त्यावर उतरल्यामुळे या भागात मोठा पोलीसफाटा तैनात करण्यात आला होता.

दरम्यान, या बलात्कार प्रकरणातील आरोपी मोहनला अटक करण्यात आलं आहे. त्याला २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी एसीपी ज्योस्ना रासम या अनुभवी महिला अधिकारी आहेत. त्यांची तपास अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या हाताखाली एक विशेष तपास पथक तैनात करण्यात आले आहे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here