साकीनाका बलात्कारप्रकरणी राजावाडी रूग्णालयाबाहेर भीम आर्मीची निदर्शने

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : साकीनाका येथे एका पीडितेवर झालेल्या अत्याचारानंतर तिचा आज दुर्दैवी मृत्य झाला. या प्रकरणी भीम आर्मी मुंबई प्रदेशच्या वतीने राजावाडी रूग्णालयात जाऊन पीडित कुंटूंबाची भेट घेतली. यावेळी पीडित कुंटूंबाला भेटण्यासाठी भीम आर्मी मुंबई प्रदेशचे शिष्टमंडळ गेले असता त्यांना पोलीसांनी अडवले. भीम आर्मीच्या कार्यकत्यांनी दिलेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.

अखेर पोलिसांनी पीडित कुंटूंबाची भेट करून दिली. पीडित कुंटूंबाला भेटून त्यांना दिलासा देण्यात आला. पीडित कुंटूंबाला न्याय मिळालाच पाहिजे. केंद्र सरकार मुर्दाबाद, राज्य सरकार मुर्दाबाद अशा यावेळी घोषणा देण्यात आल्या. पीडित कुंटूंबाला न्याय मिळाला पाहिजे. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी भीम आर्मीच्या मुंबई प्रमुख उपाध्यक्ष योगीनी पगारे यांनी केली आहे.

या आंदोलनात महादू पवार, अविनाश गरूड, विकी शिंगारे, दिनेश शर्मा, क्रांती खाडे, तृप्ती वाघमारे, बालाजी घाडगे तसेच आझाद समाज पार्टीचे मुंबई अध्यक्ष कैलास जैस्वार आदी पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here