शॉर्ट्स घातली अडवलं; परीक्षा हॉलमध्ये मुलीवर आली पडदा गुंडाळण्याची वेळ

तेजपूर (आसाम) : येथे एका १९ वर्षांच्या युवतीला तिने घातलेल्या कमी कपड्यांमुळे प्रवेश परीक्षेला बसू न देण्याचा निर्णय घेतल्यानं खळबळ उडाली. या युवतीनं शॉर्ट्स घातली असल्याने पर्यवेक्षकांनी तिला परीक्षेसाठी प्रवेश नाकारला होता. अखेरीस तिला आपले पाय झाकण्यासाठी पडदा गुंडाळण्याची वेळ आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, येथील गिरीजानंद चौधरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एण्ड टेक्नॉलॉजीमधील परीक्षा केंद्रावर १५ सप्टेंबर रोजी या वर्षीची कृषी प्रवेश परीक्षा देण्यासाठी शॉर्ट घालून गेलेल्या १९ वर्षांच्या युवतीला पर्यावेक्षकांनी अडवलं. तिने शॉर्ट्स घातल्याने तिला परीक्षेला बसू दिलं जाणार नाही असं सांगण्यात आलं. तिच्या वडिलांना बाजारातून पूर्ण पायाची पॅण्ट आणायाला सांगितली. मात्र त्यांना ती जवळपास न मिळाल्याने ते रिकाम्या हातांनी पुन्हा परतले. या युवतीने पर्यावेक्षकांना शॉर्ट्सला परवानगी नाही असं कुठे अॅडमिटकार्डवर म्हटलं नसल्याचं सांगितलं.



जुबली म्हणाली की मला गेटवर कोणाही अडवलं नाही. सर्व चेकिंग झालं मात्र परीक्षा हॉलमध्ये जात असताना पर्यावेक्षकांनी अडवलं. त्यांनी शॉट्स घातले म्हणून परीक्षेला बसता येणार नाही असं सांगितलं. त्यावर मी त्यांना प्रश्न विचारला, माझ्याजवळ आवश्यकती सर्व कागदपत्र आहेत. परीक्षेला कोणते कपडे घालून यावे असं अॅडमिटकार्डवर कुठेही लिहिलेलं नाही. तर मला कसं कळणार? शॉर्ट्स घालणं हा काही गुन्हा आहे का? अनेक मुली छोटे कपडे घालतात. पर्यवेक्षकांनी माझ्या वडिलांना दुसरी पँट आणण्यासाठी पाठवलं. मात्र जवळपास न मिळाल्यानं अखेर तिला पाय झाकण्यासाठी पडदे गुंडाळायला लावले आणि मग परीक्षेला बसू दिलं. या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here