मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : स्वराज्य रक्षक संभाजी, चार दिवस सासूचे, स्वप्नांच्या पलीकडे, मुलगी झाली रे, माझी तूझी रेशीम गाठ या व अश्या अनेक टी व्ही सिरीयलमध्ये तसेच हिंदी मराठी चित्रपटामध्ये आपला अभिनयाचा एक वेगळा ठसा उमटविणारे कोल्हापूरचे सुपुत्र सिने अभिनेते,उद्योजक आनंद काळे यांच्या शुभहस्ते आज सकाळी ११ वाजता संस्थेच्या प्रमुख कार्यालयात श्री ची आरती संपन्न झाली
यावेळी संस्थेचे संचालक सतीश बीडकर , सुनील मुसळे,अरुण भोसले(चोपदार),सुभाष कांबळे,अनिल चोपदार,ललित चिकसकर, बबन बिरंजे, हणमंत जोशी, ,पोवार सर,प्रमुख व्यवस्थापक रवींद्र बोरगावकर,अरुण पाटील, सिद्देश मंगेशकर व इतर मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता संस्थेचे सह खजिनदार श्री. शरद चव्हाण यांच्या शुभ हस्ते व सामाजिक कार्यकर्ते श्री. शशिकांत नलवडे यांच्या उपस्थितीत श्री ची आरती करण्यात आली यावेळी संस्थेचे संचालक श्री रणजित जाधव तसेच वरीलप्रमाणे मान्यवर उपस्थित होते.

उद्या सकाळी ११ वाजता संस्थेचे स्वीकृत संचालक व निर्मिती व्यवस्थापक रवींद्र गावडे यांच्या शुभ हस्ते व सायंकाळी ६ वाजता सही रे सही फेम सुप्रसिद्ध अभिनेते भरत जाधव यांच्या शुभहस्ते श्री ची आरती होणार आहे.






