मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : मोबाईल गेम खेळण्यावरून भावासोबत वाद झाल्याने आलेल्या रागात १६ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना मुंबईतील समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. उंदीर मारण्यासाठी वापरले जाणारे विषारी औषध पिऊन या मुलीने रागात आपल्या भावासमोरच आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री ११०.३० वाजता ही घटना घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी एक १६ वर्षीय मुलगी आपल्या लहान भावासोबत मोबईलवर गेम खेळत होती. गेम खेळत असताना या मुलीचे आपल्या भावासोतब किरकोळ कारणामुळे भांडण झाले. भांडणानंतर राग अनावर झाल्यामुळे ही मुलगी जवळच्या मेडिकल स्टोअरमध्ये गेली. तिथून उंदीर मारणारे औषध घेऊन ती घराबाहेर आली. त्यानंतर आपल्या लहान भावासमोर तिने हे रॅटोल हे औषध प्यायले. मुलीच्या आई-वडिलांनी तसेच शेजाऱ्यांनी या मुलीला शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र, या मुलीचे प्राण वाचू शकले नाही. मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच समता नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पीएसआय संतोष खर्डे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच कुटुंबीयांची चौकशी केली. या घटनेचा तापस पोलीस करत आहेत. शनिवारी सकाळी १० च्या सुमारास मुलीचा शताब्दी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शवविच्छेदन केल्यानंतर मुलीचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला. रागामुळे १६ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक करण्यात येत आहे.






