मुंबई (गणेश तळेकर) – दरवर्षी मोठ्या संख्येनं मुंबईतून कोकणाच्या दिशेनं जाणाऱ्यांची संख्या पाहता एसटी गाड्यांची संख्याही मोठी असते. यंदाच्या वर्षी कोरोनाचं संकट लक्षात घेता परिवहन मंडळाकडून प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी खास कोकणासाठी ३ हजार एसटी गाड्यांची व्यवस्था करण्यात आल्याचं खुद्द राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबतची माहिती दिली. एसटी प्रवासासाठीच्या आरक्षण प्रक्रियेला अर्थात बुकींगला आज मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरुवात होणार असल्याचं सांगितलं. त्याशिवाय गणेशोत्वसाठी गावाला जाणाऱ्यांकरता आता १० दिवसांचा क्वारंटाईन कालावधी असणार आहे. होम क्वारंटाईन पद्धतीनं त्यांना या नियमांचं पालन करावं लागणार आहे.
कोकणात जाणाऱ्यांसाठी नियम पुढीलप्रमाणे आहेत. जे चाकरमानी कोकणात जातील, त्यांना १२ ऑगस्टपर्यंत अपेक्षित स्थळी पोहचायचं आहे, त्यांच्यासाठी १० दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी करण्यात आला आहे, १२ तारखेनंतर जायचं झाल्यास त्यांनी मागील ४८ तासांत कोरोना चाचणी करणं गरजेचं असेल, एका एसटी बसमध्ये २२ जण प्रवास करु शकतील, ग्रुप बुकींग केल्यास एसटी थेट गावात जाईल. ही एसटीमध्ये कुठंही थांबणार नाही, एसटीनं जाणा-यांसाठी ई पासची गरज नाही







