पुणे (अजय पवार) – पोलीस प्रायव्हेट सिक्युरिटी पाटर्नरशिप प्रोग्राम महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रक्षा बंधन पी-४ परिवारात वेगळ्याच पद्धतीने साजरा करण्यात आला.
पी-४ मधील अधिकृत सुरक्षा सेवा पुरविणाऱ्या अनेक खाजगी सुरक्षा पुरवठादार संस्थेच्या माध्यमातून पुण्यातील सुरक्षा रक्षकांना राखी बांधण्याचे कर्तव्य पार पाडले.
भारत शिल्ड फोर्स कपंनीच्या संचालिका कु. शुभदा यादव व कु. भक्ती वाघ तसेच पी-४ च्या व्यवस्थापक कु. नमिता कदम आणि कु.तृप्ती चव्हाण या महिला अधिकाऱ्यांनी आपल्या अनोख्या अंदाजात आणि वेगळाच रक्षाबंधन सण साजरा केला.
कारण जे कर्मचारी दिवस रात्र मनापासून आपल्या जीवाची पर्वा न करिता समाज्यातील सर्वच क्षेत्रात जीविताची, संपत्तीची, माहितीची रक्षा करतात अशा सुरक्षा रक्षकांना कोणीही वाली नसते हे कर्मचारी महाराष्ट्रातील व इतर राज्याच्या कानाकोपऱ्यातून पुण्यात कर्तव्यास आहेत. घरापासून शेकडो किलोमीटर दूर असल्याने कोणताही सण मनापासून ते साजरा करू शकत नाहीत म्हणून अशा सर्वांना भाऊराया गृहीत पकडून त्यांना रक्षा बांधून त्यांना चरण स्पर्श करीत व अल्पोहार देऊन मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा करण्यात आला.
सुरक्षा कर्मचाऱ्यांना अशी अनोखी भेट देण्यात आल्याने त्यांना अश्रू आवरता आले नाही, विशेष म्हणजे त्या सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ओवाळणी ताटात प्रति २०० रुपये पेक्षा जास्त रक्कम आनंदाश्रू नयनांनी टाकून त्या भगिनींना आशीवार्द देयाला विसरले नाहीत. असा प्रकार चालक व मालक यांच्या समोरच झाल्याने अनेकांचे मालकाला उर भरून आले.








