चोपडा (प्रतिनिधी मिलिंद वाणी) : आज चोपडा येथील पत्रकार बांधवांना चोपडा मतदार संघाचे माजी आमदार श्री चंद्रकांतजी आण्णा सोनवणे यांच्या शुभहस्ते मेडिसीन किटचे वाटप करण्यात आले.
जळगाव जिल्हयातील चोपडा येथील पत्रकारांनी कोरोनाच्या काळात सतत बाहेर राहून आपल्या कर्तव्याशी दोन हात करीत आपले कार्य बजावत असतात. जेणे करून जनते पर्यंत दिवस भरातील ताज्या घडामोडीच्या बातम्या पोहचवणे हाच ध्यास मनाशी बाळगून बातम्या घराघरापर्यंत पोहचवतात. काही वेळा अवघड व कठीण प्रसंगातून बातमी घेण्यासाठी जावे लागते. हे काम करीत असतांना ह्या ना त्या समस्यांचा सामना करावा लागतो. हे सर्वांचा विचार करीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या दुरदृष्टीकोनातून सर्व पत्रकारांचा विचार करीत त्यांना जिवाची तमा न बाळगता सतत वेळीअवेळी आपले कार्य करणा-या पत्रकार बांधवांना सुरक्षाच्या दृष्टीने यांच्या सुविचाराने व डॉ.श्रीकांत शिंदे फाऊण्डेशनच्या वतीने व पालकमंत्री ठाणे/ गडचिरोली जिल्हा आणी शिवसेना नेते तथा राज्याचे मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या सौजन्याने मेडिसीन किटचे वाटप चोपडा मतदार संघाचे माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी चोपडा तालुक्साचे मा. तहसिलदार श्री अनिल गावित साहेब व राजकीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पत्रकार बंधूंना वाटप करण्यात आले. यावेळी संजीव सोनवणे, अनिलकुमार पालीवाल, पंकज पाटील, प्रवीण पाटील, शाम जाधव, लतिष जैन,उमेश नगराळे, महेश शिरसाठ, सचिन जयस्वाल, कैलास बाविस्कर, नंदलाल मराठे, रविंद्र पाटील, हेमकांत गायकवाड,विलास पाटील, डॉ.सतिष भदाने, महेश पाटील,छोटू वारडे , विश्वास वाडे आदी पत्रकार उपस्थित होते.
या प्रसंगी हरीषभाऊ पाटील जि.पसदस्य ,एम व्ही पाटील पं.स.सदस्य ,गंभीर सर राजुभाऊ पाटील ता.प्रमुख ,न.पा.नगरसेवक किशोरभाऊ चौधरी, नगरसेवक प्रकाशभाऊ राजपुत ,विकासभाऊ पाटील, नितीन पाटील ,नरेद्र बाविस्कर, धिरज गुजराथी, प्रतिभा माळी, प्रवीणभाई जैन, गणेशपाटील, नामदेव पाटील ,पिताराम पावरा, ज्ञानेश्वर अहीरे संरपच हातेड खु., सुरेश दादा पाटील वढोदा, सोमनाथ पाटील आडगांव ,संदीप धनगर अकुलखेडा, प्रेमचंद पाटील, सुनिल पाटील,दीपक बिऱ्हाडे जगदीश मराठे दिपकभाऊ चौधरी अनिल बाविस्कर दिव्यांक सांवत छोटुभाऊ वडगाव,राजेद्र पाटील सर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.






