विलेपार्ले येथे जावयानं दगडाने सासूचं गुप्तांग ठेचून केली हत्या

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : विलेपार्ले परिसरात एका जावयानं आपल्या सासूची भयंकर पद्धतीनं हत्या केली आहे. या क्रूर घटनेनं पुन्हा एकदा महाराष्ट्राची राजधानी हादरली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून असून आरोपी जावयाला बेड्या ठोकल्या आहेत. हत्या करणारा आरोपी तरुण हा विलेपार्ले परीसरातील रहिवासी आहे.

काही दिवसांपूर्वी त्याला पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली अटक केली होती. या प्रकरणात तो १ सप्टेंबर रोजी जामिनावर सुटून तुरुंगाबाहेर आला. दरम्यान त्याच्या पत्नीनं दुसरं लग्न केल्याचं त्याला समजलं. एवढच नव्हे तर त्याच्या पत्नी दुसऱ्या नवऱ्यापासून गरोदर आहे, हे कळल्यावर त्याचा पारा चढला. आरोपी जावई सासूच्या घरी गेला असता, त्याचं सासूसोबत जोरदार भांडण झालं. बायकोचं दुसरं लग्न लावून दिल्याच्या रागात आरोपीनं सासूला जबरी मारहाण केली.

आरोपी जावई एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यानं दगड आणि चाकूनं सासूच्या गुप्तांगावर वार करत गुप्तांग दगडानं ठेचलं आहे. या माणुसकीला हादरवणाऱ्या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच विलेपार्ले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वपोलिसांनी जखमी महिलेला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण उपचार सुरू असताना पीडित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संबंधित आरोपी १ सप्टेंबर रोजी जामिनावर सुटून बाहेर आला होता. यानंतर त्यानं २ सप्टेंबर सासूची क्रूरतेनं मारहाण केली होती. यानंतर आता संबंधित जखमी महिलेनं रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला आहे. या घटनेचा पुढील तपास विलेपार्ले पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here