मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : प्रसिद्ध लावणीसम्राज्ञी सुरेखा ताई पुणेकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, राष्ट्रवादी सांस्कृतिक विभाग मुंबई अध्यक्ष मनोज व्यवहारे यांच्या उपस्थिती मध्ये प्रवेश होणार आहे.
दिनांक १६ सप्टेंबर रोजी मुंबई प्रदेश कार्यालय येथे सुरेखाताई पुणेकर या राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाची जबाबदारी घेणार आहेत आणि महाराष्ट्रातील कलाकारांच्या समस्यांविषयी प्रश्न देखील मांडणार आहेत.






