सरपंच सेवा संघाचे जयदीप वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे वृक्षलागवड
नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि कुबेर जाधव) : संपुर्ण महाराष्ट्रात सरपंचांच्या मनामनात रुजलेली सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश च्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मा.सिने अभिनेते सयाजी शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सह्याद्री देवराई वृक्षलागवड चळवळ उभी करू सरपंच यांना प्रेरणा देऊन वृक्षलागवड करू महाराष्ट्र वृक्षलागवडीचे गरज तसेच भविष्यात वृक्षलागवड हा उपक्रम राबविला तर माणसाला कोणत्याही प्रकारची आरोग्यासाठी उपयोगी पडणार आॅक्सीजनचा तुतवडा भासणार नाही सरपंच सेवा संघाचे मागदर्शक जयदीप वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श सरपंच भाऊ मरगळे यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब पावसे यांच्या भरीव योगदान कामगिरीतुन सोशल मीडिया प्रमुख रोहीत पवार तसेच सह्याद्री देवराई च्या माध्यमातून सिने अभिनेते सयाजी शिंदे सरांच्या प्रेरणादायी उपक्रम सरपंचांच्या माध्यमातून महाराष्ट्र भर वृक्षलागवडीची मोठी चळवळ उभी झाली.
या चळवळीच्या माध्यमातून गेली अनेक दिवसांपासून वृक्षारोपण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याने भविष्यात महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात लोक सहभागातून एक रोपवाटिका तयार करून पुढील वर्षी कोणत्याही वृक्षलागवड करण्यासाठी वृक्ष या रोपवाटिकेत मार्फत तालुक्यातील सरपंच सामाजिक संस्था यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण तसेच वृक्षसंवर्धन करण्यासाठी वृक्षलागवड सामाजिक चळवळीत सहभागी होऊन राज्यात वृक्षलागवड उपक्रम यशस्वी करण्यासाठी आपण सहकार्य करावे अशी अपेक्षा सह्याद्री देवराई तसेच सरपंच सेवा संघाच्या वतीने एका पत्रकाद्वारे केले आहे यावेळी सरपंच सेवा संघाचे मागदर्शक प्रदेश कार्यकारिणी सदस्य सागर पावसे आदर्श सरपंच सागर शेलार कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष सरपंच दत्तात्रय कांबळे शिरूर तालुका समन्वयक विजय खेडेकर प्रदेश उपाध्यक्ष तथा औरंगाबाद वाळूज चे सरपंच जयकुमार माने मा देवेंद्र पाटील धुळे जि प सदस्य यांच्या सह सरपंच सेवा संघाचे समर्थक उपस्थित होते.






