मॅड स्टुडिओच्या बाप्पा गणेशा या गाण्यातून रंगलीय बाप्पाच्या अस्तित्वाची व भक्तांच्या भक्तीची अनोखी महफील

कारंजा (तालुका प्रतिनिधी हफीज खान) : सध्या सर्व बाप्पाच्या भक्तीरसात रंगलेत. त्यासोबतच कलाकारांसाठी कलेचे दैवत असलेले बाप्पा सध्या सर्वांच्या घरात आणि मनात विराजमान आहेत सध्या सुरु असलेल्या कोरोना संकटाशी मात्र संपूर्ण जग झुंज देत आहे त्याच संकटात असतांना मॅड स्टुडिओच्या सर्व कलाकारांनी एकत्र येऊन बाप्पाच्या अस्तित्वाची व भक्तांच्या भक्तीची अनोखी महफील बाप्पा गणेशा या गाण्यातून सर्वांसमोर मांडली आहे.

या गाण्याचा ऑडिओ पुण्यात वेलकम स्टुडिओमध्ये तयार झाला.बाप्पाचं गाणं रेकॉर्ड करण्यासाठी पूर्ण ४ दिवस लागले.पुण्यात ललित कला केंद्रात आणि गंधर्व महाविद्यालयात शिकणाऱ्या युवा कलाकारांनी या गाण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.संकट खूप येत होती पण विघ्नहर्ता पाठीशी होता.या गाण्यासाठी पुण्यातील मोठ्या कलाकारांचे देखिल आशिर्वाद आमच्या पाठीशी होते. विशेष म्हणजे हा संपूर्ण गाणंच शूटिंग धुळे येथील गुरुदत्त मित्र मंडळ कृष्णवाडी येथे झाले. गाण्याचं चित्रीकरण करताना खूप मज्जा आली सध्या सुरु असलेले कोरोनाचं संकट त्यात सेट रेडी झाल्यानंतर आलेला पाऊस म्हणजे आमच्या साठी दुष्काळात १३ महिनाच होता. पण असं म्हणतात ना की कलेला मेहनीतितची जोड असली तर कितीही मोठं संकट आलं तरी कलाकार मागे हटत नाही कलाकारांन सोबत च पारड्या मागच्या कलाकारांची मेहनत ही निराळीच असतें

bappa-ganesha

पाऊस पडल्यानंतरही पुन्हा एकदा त्या च जोमाने मंडळातील सर्व लहान मोठ्या कला प्रेमींनी तो सेट पुन्हा उभा केला. 2 दिवस पाऊसात सुरु असलेल्या गाण्याच्या या शूटिंग मागे सर्वच लोकांची खूप मेहनत गाण्यातून दिसून येते. या गाण्यासाठी म्युझिक अरेंजर ओमकार उजागरे, रिदम ॲरेंजर कार्तिक स्वामी, मंगेश जोशी, कोरस ज्ञानेश्वर पंडित, मानसी भागवत, रेकॉर्डिंग मुकुंद फडाकाले, मिक्सिंग ॲण्ड एडिटिंग केदार जोशी मास्टरिंग ग्रे स्पार्क स्डुडिओ, आर्ट डायरेक्टर राज गवळी, अल्बम पोस्टर नयनीश पगारे, शुभम माळी, डान्स कोरियाग्राफी प्रीतम पाटील तसेच कारजा येथील तन्मय दिग्रसकर यांचा सहकार्य व सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here