मुलगी झाल्याच्या आनंदात त्याने ५० हजार लोकांना मोफत वाटली पाणीपुरी

भोपाळ (मध्यप्रदेश) : काळ पुढे गेला असला तरी अनेकांना मुली नकोशा असतात मात्र एका पाणीपुरी विक्रेत्यानं मुलगी झाल्यावर साजरा करणं हे अत्यंत कौतुकास्पद आहे. पाणीपुरीवाल्या आंचल यांचं देशभर कौतुक करण्यात येत आाहे. गरीब परिस्थिती असताना देखील आपल्या मुलीच्या जन्माचा असा जल्लोष साजरा केल्यानं सर्वांनीच त्यांचं कौतुक केलं आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भोपाळमधील आंचल गुप्ता कोलार मार्गावर रहिवासी आहे. आंचल हे पाणी-पुरीचा व्यवसाय करतात. १७ ऑगस्ट रोजी आंचल यांच्या घरी एका मुलीने जन्म घेतला. मुलीच्या जन्माचा आंचल यांना प्रचंड आनंद झाला असून आपला आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी जवळजवळ ५० हजार लोकांना मोफत पाणीपुरी वाटली.

आंचल यांना मुलगी होण्याआधी एक मुलगा देखील आहे. नुकत्याच जन्मलेल्या मुलीचं नाव ‘अनोखी’ असं ठेवलं आहे. आंचल यांच्या दुकानाच्या बाहेर रांगा देखील लावल्या होत्या. पाणीपुरीचं मोफत वाटप करण्यासाठी त्यांनी दुकानाबाहेर खास मांडव टाकला होता आणि दहा स्टॉल लावले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here