नवी दिल्ली : ऑनलाईन फूड डिलीव्हरी अॅप झोमॅटोचे सहसंस्थापक गौरव गुप्ता यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २०१५ मध्ये गौरव गुप्ता झोमॅटोमध्ये सामिल झाले होते. त्यांची २०१८ मध्ये चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आणि २०१९ मध्ये सहसंस्थापक म्हणून पदोन्नती झाली होती.
झोमॅटो आयपीओच्या काळात गुंतवणुकदार आणि माध्यमांशी चर्चा करताना ते कंपनीचा चेहराच ठरले होते. मनी कंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार, झोमॅटोने फूड डिलीव्हरीसह किराणा मालाची विक्रीही ऑनलाईन सुरू करण्यास सुरुवात होती होती. काही दिवसांपूर्वी झोमॅटोने किराणा मालाची डिलीव्हरी बंद करण्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता गौरव गुप्ता यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. झोमॅटोनेही या वृत्ताबाबत पुष्टी केली आहे.
Thank you @grvgpta – the last 6 years have been amazing and we have come very far. There's so much of our journey still ahead of us, and I am thankful that we have a great team and leadership to carry us forward.https://t.co/AJAmC5ie6R
— Deepinder Goyal (@deepigoyal) September 14, 2021
झोमॅटोचे सहसंस्थापक दीपिंदर गोयल आणि गौरव गुप्ता यांच्यात काही काळापूर्वी मतभेद झाल्यानेही त्यांनी ही एक्झिट केल्याचं बोललं जात आहे. गौरव गुप्ता यांनी 6 वर्ष झोमॅटोमध्ये राहिल्यानंतर आता नवा चॅप्टर सुरू करणार असल्याचं मेलमध्ये सांगितलं आहे.






