बेयर ग्रिल्ससोबत सिंघम अजय देवगण करणार जंगल सफारी

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : डिस्कव्हरी चॅनलवरील बेयर ग्रिल्सचा ‘इंटू द वाइल्ड विद बेयर ग्रिल्स’चा प्रत्येक शो पाहण्यासाठी चाहते कायम उत्साहित असतात.

या शोमध्ये बेयर ग्रिल्ससोबत अनेक जगप्रसिद्ध सेलिब्रिटी कोणतीही सुविधा नसताना जंगलातून प्रवास करताना दिसले आहेत. या शोमध्ये बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि रजनीकांतही झळकले होते. आता अभिनेता अजय देवगणदेखील बेयर ग्रिल्ससोबत जंगलातून रोमांचक प्रवास करताना दिसणार आहे. या भागाचे शूटिंग मालदीव येथे करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

अजय देवगण हा रविवारी शूटिंगसाठी मालदीवला रवाना झालेला आहे. अक्षय कुमार आणि रजनीकांतनंतर तो बॉलीवूडमधील तिसरा अभिनेता आहे, जो बेयर ग्रिल्सच्या शोमध्ये काम करत आहे. दरम्यान, हा एपिसोड कधी प्रसारित होणार याची तारीख निश्‍चित करण्यात आलेली नाही; पंरतु त्याचा प्रीमियर लवकरच डिस्कवरी प्लस ऍपवर रिलीज करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here