शिंदखेडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील दराणे गावातील 21 वर्षीय तरुणाची दि 06.09.2021 रोजी चिमठाणा-दराणे रस्त्यावर चोरट्यांनी निर्दयीपणे हत्या केली. या चोरट्यांना पोलिसांनी पकडले पण त्यांना फाशीची शिक्षा व्हावी तसेच ही हत्येची केस फास्टट्रॅक कोर्टा मार्फत चालवून ज्येष्ठ विधीतज्ञ उज्वल निकम यांना नियुक्त करावे ह्या मागणी साठी शिरपूर तालुका राजपूत समाजा तर्फे तहसिलदार शिरपूर यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे कि मारेकरु हे सराईत गुन्हेगार आहेत. सुरत गुजरात येथून विविध गुन्हामूळे ते हद्दपार झाले आहेत. अशा माथेफिरूंना फाशी झालीच पाहिजे व त्यासाठी ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती शासनाने करावी. स्व डॉ प्रेमसिंग गिरासे यांचे आई-वडील मोल मजुरी करणारे आहेत. घरात एक लहान बहीण आहे. वडिलांची एक किडनी काम करीत नाही. आईला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. अशा अत्यंत हलाकीच्या परिस्तितीत जिवन व्यथित करणारे हे कुटुंब आहे. ज्या मुलांवर त्यांचे पुढील भविष्य अवलंबून होते तोच कर्ता मुलगा माथेफिरूंनी हिरावून घेतला. प्रशासनाने ह्या कुटुंबाला शासनाच्या विविध योजने मार्फत मदत करावी अशीही विनंती शिरपूर तालुका क्षत्रिय राजपूत समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

निवेदन देतेवेळी मार्केट कमिटीचे सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, काँग्रेस मा अध्यक्ष नितीनबाबा गिरासे, पं स माजी उपसभापती जगतसिंग राजपूत, नगरसेवक चंदनसिंग राजपूत, हर्षल गिरासे, देवेंद्र राजपूत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत, राजू टेलर, वाठोडा सरपंच नारायण कोंडू चौधरी, बोरगांव सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया, टेंभे सरपंच देवेंद्रसिंग राजपूत, महेंद्रसिंग राजपूत, डॉ दीपक राजपूत, डॉ योगेश जाधव, ऍड गोपाल राजपूत, पायल हॉटेल जितू राजपूत, राज सिसोदिया, जातोडा मा उपसरपंच जयसिंग राजपूत, डी.जे. राजपूत, मोहन राजपूत, बिट्टू राजपूत, दीपक राजपूत, दहीवद ग्रा पं सदस्य मयूर राजपूत, मानव एकता पार्टी कल्पेश राजपूत, प्रेमसिंग राजपूत, प्रकाश जमादार, पत्रकार महेंद्र राजपूत, अमोल राजपूत, दीपक राजपूत, गणपत राजपूत, लाला राजपूत, नेपाल राजपूत, ज्ञानूसिंग चौधरी, भरतसिंग राजपूत गिधाडे व मोठ्या संख्येने राजपूत बांधव उपस्थित होते.






