मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) : येथील वांद्रे पूर्वला बीकेसी ट्रेंड सेंटरजवळ बांधल्या जाणाऱ्या उड्डाणपुलाचा काही भाग कोसळल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. या दुर्घटनेत १४ जण जखमी झाले आहेत.
अनिल सिंह (२८), अरविंद सिंह (२९), अझर अली (२६), मुस्तफ अली (२८), रियाझुद्दीन (२३), मोताब अली (२८), रियाझु अली (२१), श्रावण (४९), अतिश (२२), अली (२२), एझाझ-उल-हक (२९) परवेझ (२२), अकबर अली (२५), श्रीमंत (२५) अशी जखमींची नावे असून, शुक्रवारी पहाटे ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी पुलावर २० ते २५ मजूर काम करत होते.
#WATCH | Nine people sustained minor injuries & were taken to a nearby hospital after a portion of an under-construction flyover collapsed in Mumbai's Bandra Kurla Complex at around 4:40 am today, as per a fire brigade official present at the spot
(Latest visuals from the spot) pic.twitter.com/Ddrzw0uzT5
— ANI (@ANI) September 17, 2021
पुलाचा काही भाग कोसळत असताना काही मजूर तेथून बाहेर पडण्यास यशस्वी झाले तर सुमारे आठ ते दहा मजूर जवळच्या नाल्यात पडल्याने जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशमन दल आणि मुंबई पोलिसांची टीम पोहचली असून, आपत्कालीन विभागाच्या म्हणण्यानुसार पुलाच्या ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकल्याची शक्यता नाही.






