करीम सालार यांना पत्नी वियोग

जळगाव (प्रतिनिधी) – शहराचे माजी उपमहापौर व ईकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अब्दुल करीम सालार यांच्या सुविद्य पत्नी रुखसाना सालार यांचे ६० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने आज (दि ५) सकाळी १२.३० वाजता खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती करीम सालार, २ मुले इरफान व रेहान तसेच चार मुली व नातवंड असा मोठा परिवार आहे. त्या अझीझ सालार (बिट्टू)यांच्या मोठ्या वहिनी होत्या.
जळगांव शहर व जिल्ह्यातील मुस्लिम समाजाने आपल्या शोकसंवेदना सादर केली असून, दफन विधी संध्याकाळी ५.३० वाजता शासकीय परिपत्रकानुसार जळगाव शहर कब्रस्थान मध्ये पार पडणार आहे. त्यामुळे कोणीही गर्दी करू नये अशी विनंती मुस्लिम ईदगाह व कब्रस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गफ्फार मलिक व मानद सचिव फारूक शेख यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here