दागिने चोरणाऱ्याचोराला व ते विकत घेणाऱ्या सोनाराला कर्जत पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कर्जत (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर योगेश सरावते) : कर्जत पोलीस ठाणे हद्दीत राहणारी महिला श्रीमती.अर्चना श्रीकांत मोरे रा.उदयनगर भिसेगाव ता.कर्जत यांचे घरातील कपाटातील 44,100/-रुपयाचे सोन्याचे दागिने दिनांक 02/09/2021 रोजी सकाळी 10:00 वा ते दिनांक 09/09/2021 रोजी रात्री 24:00 वा च्या दरम्यान चोरले असल्याची तक्रार कर्जत पोलीस ठाणे मध्ये दिली होती त्यांचा. सदरची तक्रार गु.र.नं.248/2021 भा.द.वि.कलम 380 अन्वये दिनांक 14/09/2021 रोजी दाखल करण्यात आली होती.

सदर गुन्ह्याचा तपास पो ना अशोक राठोड हे करीत असून संशयित इसम फिर्यादी यांचा मुलगा कृष्ण मोरे यास चौकशी करण्यासाठी ताब्यात घेवून गुन्ह्याबाबत चौकशी केली असता. त्याने उडवाउडवीची उत्तर देऊ लागला असता पोलिसांनी त्यास विश्वसात घेवून त्याच्याकडून अधिक चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली देवून त्याने चोरलेले सोन्याचे दागिने हे त्याने त्याच्या दोन मित्रांच्या मदतीने कर्जत शहरातील 3 सोनार दुकानदार यांना विकल्याचे तपासात निष्पन्न झाले. सदरच्या गुन्ह्यात मुख्य सुत्रधार चिंतामणी ज्वेलर्स दुकानाचे सोनार मालक किरण परमार व दोन अन्य ज्वेलर्सचे दुकानदार यांना पोलिसांनी ताब्यात घेवून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल करून त्यांनी घेतलेले सोन्याचे दागिने त्यात सोन्याच्या अंगठ्या, कानातले साखळी फुले, झुमके असा एकूण 44,100/-रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात कर्जत पोलिसांना यश आले असले तरी सदरच्या गुन्ह्यात ज्वेलर्स दुकानाचे नाव व मालक यांचे नाव वगळण्यात आले असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे.

कर्जत पोलिसांनी गुन्ह्यातील 06 आरोपित यांना अटक करण्यात आली असून ज्वेलर्स दुकानाचे मालक व काही व्यापाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत कर्जत पोलिस ठाण्यात एकत्र येऊन पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्यावर दबाव आणून हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी कारवाई केल्यामुळे ज्वेलर्स दुकानाचे धाबे दणाणले आहेत . कर्जत शहरात हि ज्वेलर्स दुकानावर पाहिलीच कारवाई असल्याने महिला पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांचे कौतुक होत आहे .कर्जत शहरात अनेक ज्वेलर्स दुकानात सोनं चांदी चोरीचा माल खरेदी- विक्री केला जातो?? अशी दाट शक्यता नाकारता येत नाही कर्जत पोलिसांनी या ज्वेलर्सचे दुकानदारांची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत अनिल घेरडीकर, पोलीस निरीक्षक कर्जत पोलीस ठाणे सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार सुभाष पाटील, पोलीस अंमलदार अशोक राठोड, पोलीस अंमलदार भूषण चौधरी, पोलीस अंमलदार गणेश पाटील, पोलीस अंमलदार अश्रुबा बेद्रे यांनी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here