बीडमधील रस्त्यावरच महिला आणि पुरुषात जुंपली, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ-मारहाण

बीड (प्रतिनिधी) : येथील रस्त्यावरच महिला आणि पुरुषात जुंपली. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ सोशल माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे. या सर्व प्रकारामुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, मित्र नगर भागात ११ सप्टेंबरला सदर घटना घडली आहे. हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंतही पोहोचलं आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. कॅमेऱ्यासमोर काही गोष्टी दिसत आहेत. पण तो व्हिडीओ अवघ्या काही सेकंदाचा आहे. त्या व्हिडीओच्या मागे-पुढे अनेक गोष्टी घडल्या असतील. त्या घटना जाणून घेतल्यानंतरच पोलीस योग्य निष्कर्षावर येतील. त्यामुळे पोलीस आधी याप्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. त्यांचा तपास सुरु आहे.

या प्रकरणी व्हायरल झालेल्या व्हिडीओत महिला आणि पुरुष यांच्यातील तुंबळ हाणामारी स्पष्ट दिसतेय. पण त्यामागे नेमकं कारण काय ते स्पष्ट होताना दिसत नाही. पण त्या दोघांमध्ये पैशांच्या कारणावरुन हा वाद उफाळलाची माहिती समोर आली आहे. पैशांवरुन दोघांमध्ये वाद झाला होता. याच वादाचं रुपांतर आधी बाचाबाची, शिवीगाळ नंतर हाणामारीत झालं. हाणामारीच्या वेळी घटनास्थळी काही लोकांनी त्यांना समजवण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र महिला ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हती, असं दिसतंय.

विशेष म्हणजे या प्रकरणी महिला ही शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेली. तिथे तिने संबंधित व्यक्ती विरोधात तक्रार करत मारहाणीचा व्हिडीओ देखील दाखवला. महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी एनसी दाखल करुन घेतली आहे. घटनेतील सत्यता काय आहे? याचा तपास पोलीस करत आहेत, अशी माहिती शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी माध्यमांना दिली. तसेच व्हिडीओत मारहाण करणारे महिला आणि पुरुष हे एकाच गावातील असल्याची माहिती समोर आलीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here