काशिदच्या समुद्रात दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू; जीवरक्षकांनी तिसऱ्यास बचावले

रायगड (प्रतिनिधी राजेश बाष्टे) : मुरुडच्या काशिद समुद्रात पोहण्यास गेलेल्या तीन पर्यटकांपैकी दोन जण बुडल्याची घटना आज घडली.

तिसऱ्या पर्यटकाला समुद्रकिनाऱयावरील जीवरक्षक आणि स्थानिकांच्या मदतीने वाचवण्यात यश आले आहे. बुडालेल्या दोन पर्यटकांचे मृतदेह बाहेर काढले असून बोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. बचावलेल्या पर्यटकावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. लालतू नासकर (२७), पलटू सूत्रधर (३८) अशी मृत पर्यटकांची नावे आहेत.

पुणे येथून दोन बसने १८ पर्यटक मुरुड तालुक्यातील काशिद समुद्रकिनारी पर्यटनास आले होते. मूळचे कोलकाता येथे राहणारे हे पर्यटक पुण्यातील एका कंपनीत नोकरी करतात. पाण्याचा अंदाज न आल्याने या पर्यटकांपैकी तीनजण बुडू लागले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here