लातूरमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या

लातूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील नागरसोगा गावातील एका ४० वर्षीय शेतकऱ्यानं विष प्राशन करून आत्महत्या केली. लालगिर माधवगिर गिरी असं मयत शेतकऱ्याचं नाव आहे.

लालगिर गिरी यांनी कर्जबाजारी पणाला कंटाळून विषारी औषध प्राशन केले होते. विष पिल्यानंतर ही बाब शेजाऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी आरडाओरडा करून घरच्यांना आवाज दिला. त्यानंतर तातडीने गिरी यांना लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. लालगिर गिरी हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्याकडे १ हेक्टर ५३ एक्कर जमीन आहे. अल्पभूधारक असल्यामुळे शेतीवर भागत नाही म्हणून ते खाजगी गाडीवर पुणे येथे चालक म्हणून काम करीत होते.

पण कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊननंतर ते गावात येऊन राहिले होते. त्यांच्यावर बँकेचे आणि काही खाजगी कर्ज झाले होते. कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात येतंय. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलांचं जिवन मात्र आता असहाय्य बनलं आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here