ट्रक-एसटी बसचा भीषण अपघात; २५ प्रवासी जखमी

बुलडाणा (प्रतिनिधी) – बुलडाणा-मलकापूर मार्गावर ट्रक आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला. ट्रकने एसटी बसला जोरदार धडक दिल्याने अपघातात बसमधील २५ प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना मोहेगावाजवळ सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली.

अपघातात ५ प्रवासी गंभीररित्या जखमी असून २० प्रवासी किरकोळ जखमी आहेत. सर्व जखमींवर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सोनाळा – बुलडाणा ही बस सकाळी नऊ वाजताच्या सुमारास बुलडाणाकडे येत यावेळी बुलडाणाकडून येणाऱ्या एका वाहनाला मागून येणाऱ्या ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या एसटीला जोरदार धडक दिली. त्यामुळे हा अपघात घडला. अपघात एवढा भीषण होता की यात एसटीचा काही भाग कापला गेला आहे. स्थानिकांनी तात्काळ जखमींची मदत करत त्यांना रुग्णालयात हलवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here