थकीत बिलासाठी विद्युत कंपनीने तोडला संपूर्ण गावाचा वीजपुरवठा

यवतमाळ (प्रतिनिधी आसिफ कुरैशी) : जिल्ह्यातील नेर तालुक्यातील वाई पारस या गावात थकीत वीज बिलासाठी संपूर्ण गावाचाच वीज पुरवठा बंद करण्याची वेळ विद्युत कंपनीवर आली. गावातील बहुसंख्य घरांचे वीज बिल थकीत असल्याने, प्रत्येकाची वीज कापण्याऐवजी शनिवारी डीपीवरून संपूर्ण गावाचाच पुरवठा खंडीत करण्यात आला.

वाई पारस या गावाला दारव्हा उपविभागाच्या लोही वितरण केंद्रावरून वीजपुरवठा केला जातो. या गावात १७५ घरे आहेत त्यातील ७० लोकांकडे वीज जोडण्या आहेत. ६५ लोकांकडे वीज बिलाची मोठी रक्कम थकीत झाली. बिलाचा भरणा करण्याच्या सूचना कंपनीने लोकांना वारंवार दिल्यात. परंतु कोणीही रक्कम न भरल्याने वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय कंपनीने घेतला. अखेर डीपीवरूनच पुरवठा खंडित करावा लागला. विद्युत कंपनीच्या पथकाने ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here