मलकापूरात एकाच दिवशी दोन तरुणांची आत्महत्या

मलकापूर (प्रतिनिधी) : येथे एकाच दिवसात दोन तरुणांनी आत्महत्या केल्याचा धक्कादाकक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. एका तरुणाने घरात गळफास घेत तर दुसऱ्याने शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली आहे.

किशोर वानखेडे, (वय २९) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो मलकापूर शहरातील मंगलगेट परिसरात राहावयास होता. व रोशन टावरी, (वय ३८) असे दुसऱ्या तरुणाचे नाव असून तो मलकापूरातील वृंदावननगर येथे राहत होता.

किशोरने काल दुपारी साडेतीनच्या सुमारास राहत्या घरातील मागच्या खोलीत टिनाच्या पाईपला साडीने गळफास लावून घेतला. तर रोशनने वृंदावन नगरच्या मागे असलेल्या शेतातील आंब्याला झाडाखाली विष घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, या तरुणांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here