साऊथ सुपरस्टार थलापथी विजयनं दाखल केला स्वत:च्या आईवडिलांविरुद्ध गुन्हा

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : साऊथ सिनेमातील प्रसिद्ध अभिनेता थलापथी विजय यानं वडील एस. ए चंद्रशेखर आणि आई शोभा यांच्यासह ११ जणांविरोधात कोर्टात खटला दाखल केला आहे. कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत अभिनेता विजयने कोणत्याही लोकांना एकत्र जमवण्यासाठी आणि कुठल्याही प्रकारची मिटींग घेण्यासाठी माझ्या नावाचा वापर केला जाऊ नये अशी मागणी केली आहे. कोर्टात या प्रकरणाची सुनावणी येत्या २७ सप्टेंबरला होणार आहे.

अभिनेता विजय याने राजकारणात यावं अशी त्याच्या वडिलांची म्हणजे एस ए चंद्रशेखर यांची इच्छा होती. त्यासाठी विजयचे वडील चंद्रशेखर यांनी विजय याच्या नावाचा पक्ष रजिस्टर करण्यासाठी पाऊल टाकलं. विजय यांच्या वडिलांनी घोषित केले की, पद्मनाभन पार्टीचे अध्यक्ष आमचे नातेवाईक असतील. शोभा खजिनदार आणि स्वत: विजय यांचे वडील पक्षाचे जनरल सेक्रेटरी राहतील.

आता अभिनेता विजयनं जाहीरपणे निवेदन जारी करत म्हटलंय की, असा कुठलाही पक्ष स्थापन करण्यासाठी माझी सहमती घेण्यात आली नव्हती. त्यामुळे त्याने आईवडिलांसोबत ११ जणांविरोधात कोर्टात दावा दाखल केला आहे. जेणेकरून लोकांना एकत्रित आणण्यासाठी आणि माझ्या नावाचा वापर करून मिटींग करण्यावर बंदी आणावी अशी मागणी विजय याने कोर्टात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here