शिर्डी (प्रतिनिधी प्रसाद भागवत) : शिर्डी साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी आमदार अशुतोष काळे तर सुहास आहेर यांची विश्वस्त पदी नेमणुक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आमदार आशुतोष काळे यांच्या बरोबरच अहमदनगर जिल्ह्यातील ९ जणांना विश्वस्त मंडळात संधी देण्यात आली आहे.याप्रसंगी आ.आशुतोष काळे यांच्या समवेत सलग तिसऱ्यांदा विश्वस्त झालेले डॉ.एकनाथ गोंदकर, सुरेश वाबळे, श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक, महेंद्र शेळके, सचिन गुजर, शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, अविनाश दंडवते, जयंत जाधव, सुहास आहेर आदींनी पदभार स्वीकारला.

साईसंस्थांनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी नुतन विश्वस्त मंडळाचा सत्कार केला.साईभक्तांच्या सुविधेसाठी सहकारी विश्वस्त संस्थान अधिकारी कर्मचारी आणि शिर्डीकर ग्रामस्थ यांच्या विचारातून विकास काम करण्याचा निर्धार नुतन अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.






