शिवसेनेचे नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांनी ओवळा येथे लसीकरण शिबिराचे आयोजन

ठाणे (प्रतिनिधी अजय कल्याणे) : ओवळा-घोडबंदर परिसर कोरोनामुक्त करण्याचा ध्यास घेतलेले स्थानिक युवानगरसेवक सिद्धार्थ दिलीप ओवळेकर यांनी आपल्या प्रभागात लसीकरणाची जोरदार मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. प्रभाग क्र.१ अंतर्गत आज पर्यंत एकूण ३२,२४२ नागरिकांचे लसीकरण झालेले आहे, व खाजगीकरणातून ३६९८ आणि ठाणे महानगरपालिकेच्या मार्फत नियमित २८,५४४ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

स्थानिक नगरसेवक सिद्धार्थ दिलीप ओवळेकर यांनी वाढदिवसानिमित्त त्यांनी स्वखर्चाने ज्युपिटर रुग्णालया मार्फत ५०० नागरिकांचे लसीकरण केले होते. तसेच इतर आय टी पार्क व कार्पोरेट कर्मचारीवर्ग करीता जी काॅर्प येथे ५००० लसीकरण मोहीम पूर्ण करून, गृहसंकुले, आदिवासी पाडे, क्लब हाऊस, शाळा व इतर ठिकाणी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली व रिक्षा चालकांसाठी १००० पेक्षा अधिक लस उपलब्ध करून दिलीत.

owala-corona-vaccine-camp

शिवसेनेचे नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांनी ओवळा येथे पुन्हा शिबिराचे आयोजन करुन पंतप्रधानांना अनोख्या शुभेच्छा देताना ठाण्यासह महाराष्ट्र राज्याला जादा लस पुरवठा करण्याचे आवाहन केले आहे. या आधीही त्यांनी नगरविकास मंत्री पालकमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे व महापौर मा.श्री. नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकवेळा शिबिरे आयोजित केली आहेत. विशेष म्हणजे, या लसीकरण शिबिरांची सुरुवात त्यांनी आदिवासीपाड्यांमधून केली असून आता मोठमोठ्या गृहसंकुलांमध्ये, गाव , पाडे येथे लसीकरण शिबिरे आयोजित करण्यासाठी ते पुढाकार घेत आहेत.

यासंदर्भात त्यांनी सांगितले की, गेल्या अनेक महिन्यांपासून आपण नगरविकास मंत्री पालकमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब व महापौर नरेश म्हस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण शिबिरे आयोजित करीत आहोत. सबंध ठाणे शहर कोरोनामुक्त करण्याचा चंग आम्ही बांधला असून त्याची सुुरुवात मी आपल्या प्रभागापासून केली आहे. ठाणे शहर कोरोनामुक्त करण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे. त्यामुळे पंतप्रधानांनीही या कामी आम्हाला साह्य करावे. जर त्यांनी ठाणे शहराला 5 ते 10 लाख आणि राज्याला 10 कोटी जादा लस उपलब्ध करुन दिल्या तर आम्ही ठाणे शहरासह महाराष्ट्राला कोरोनामुक्त करुन दाखवू. यासाठी पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रला भरघोस मदत करावी, असे आवाहनही सिद्धार्थ दिलीप ओवळेकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here