‘कन्यादान’ च्या जाहिरातीत हिंदू धर्माचा अपमान झाल्याने अलियावर संतापले नेटकरी

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : बॉलिवूडमध्ये अल्पावधीत आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झालेली अभिनेत्री अलिया भट्ट तिच्या एका जाहिरातीमुळे चर्चेत आली आहे. ही कपड्यांच्या ब्रँडसाठी केलेली जाहिरात असून आलिया यामध्ये हिंदू धर्मातील कन्यादान या मुद्द्यावर व्यक्त होताना दिसत आहे. मात्र या जाहिरातीमध्ये मांडलेल्या भूमिकेवरून नेटकरी तिच्यावर चांगलेच संतापले आहे.

सध्या सोशल मीडियावर आलियाची ही जाहिरात चांगलीच व्हायरल होत आहे. या जाहिरातीत आलिया लग्नाच्या मंडपात बसली असून मुलगी दान करण्याची गोष्ट नाही. त्यामुळे कन्यादान का करावं असा प्रश्न तिने या जाहिरातीत विचारला आहे. मात्र, कन्यादानावर तिने उपस्थित केलेला प्रश्न नेटकऱ्यांना आवडला नाही. त्यामुळेच सध्या सोशल मीडियावर आलिया आणि या कपड्याच्या ब्रॅण्डला बॉयकॉट करण्याची मागणी होत आहे.



या जाहिरातीत तिने मांडलेली भूमिका अनेकांना खटकली आहे. परिणामी, नेटकरी सोशल मीडियावर तिला चांगलेच ट्रोल करताना दिसत आहेत. या जाहिरातीत आलियाने हिंदू धर्माचा अपमान केला आहे, असाही आरोप तिच्यावर करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here