जळगाव महानगर भाजप मंडल क्र. ५ तर्फे रथ चौक पिंप्राळा येथे प्रभू श्रीरामांच्या तैलचित्राचे पूजन व आरती सोहळा

जळगाव (निलेश पाटील) – भाजप मंडल क्र. ५ ( पिंप्राळा परीसर ) जळगांव महानगर तर्फे आज दि: ५ ऑगस्ट रोजी दुपारी १२:३५ वा.शिंपी गल्ली रथ चौक पिंप्राळा या ठिकाणी प्रभू श्रीरामांच्या तैलचित्राचे पूजन व आरती सोहळा सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले श्री.भामरे साहेब व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगरकार्यवाह श्री. विजयजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी मंडल क्र. ५ चे अध्यक्ष श्री.शक्तीभाऊ महाजन युवा मोर्चा ५ मंडल अध्यक्ष महेश राठी जिल्हा सोशल मीडिया प्रमुख श्री. महेशभाऊ ठाकूर सरचिटणीस उमेश सुर्यवंशी जीभाऊ वानखेडे संजयभाऊ तायडे रिंकुभाऊ चौधरी धीरज चौधरी महेंद्र परदेशी मंडल क्र.५ महिला आघाडी अध्यक्षा नितुताई परदेशी ज्योतिताई पालीवाल विद्याताई सोनवणे छायाताई सारस्वत शोभाताई कुळकर्णी व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here