जनमत प्रतिष्ठान व सेवाश्रम फाऊंडेशनतर्फे श्रीराम उत्सव

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – काल (दि.५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे श्री राम मंदिराचे भूमिपूजन संपन्न झाले. यानिमित्ताने देशभरातील नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला. रामजन्मभूमीच्या या कार्यात खारीचा वाटा म्हणून जनमत प्रतिष्ठान व सेवाश्रम फाउंडेशनतर्फे जनमत फाऊंडेशनचे अध्यक्ष पंकज नाले यांच्या घरी श्रीराम उत्सव साजरा करण्यात आला. लाइफ केअर मेडिकलमध्ये, तसेच मंदिरामध्ये श्री रामाची पूजा करण्यात आली व प्रभागांमध्ये प्रसाद वाटप करण्यात आला,, याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, सेवाश्रम फाऊंडेशनचे विवेक ठाकरे, शितल ताई जडे शिक्षक भारतीय अध्यक्ष, व प्रवीण भाऊ कोलते आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here